Posts

कशासाठी? देशासाठी... दोन-हजारी नोटांसाठी...

कशासाठी? देशासाठी..  दोन-हजारी नोटांसाठी..

चला शोधू ब्लॅकमनी मल्ल्याची, पण, धुवू धुणी पंप्र बोले टीव्हीवरी भक्त ओरडे 'फेबु'वरी कोऱ्या नोटा हाती धर कार्डाचाही use कर कॅश येणे बंद झाली एटीएमची काशी, साली!!  थडथड ठ्यांवठ्यांव
सीमेवर उभं ऱ्हावं
सेनेमध्ये नाहीत त्यांनी, 
रांगेत करा झक-मारी 
 कळ काढा थोड्यासाठी
कशासाठी? देशासाठी...

भरडावे दीन-जन
अदानीची होवो चैन
एटीएम हे भरात
लोकांची निघे वरात
कमळाचे दल डोले
चिखलाने भरे तळे
मोदी जाती जपानात
'रेड्डी' नाचे लगनात
काळेपैशेवाला भाऊ
त्याच्या सवे दारू पिऊ
जनता अनोशापोटी 
कशासाठी? देशासाठी..


-हेमंत राजोपाध्ये

डॉ. शेषराव मोरे ह्यांच्या ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ ह्या लेखाचा प्रतिवाद

प्रा. शेषराव मोरे ह्यांच्या ११मे २०१६रोजीच्या लोकसत्तेत प्रकाशित झालेल्या ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ ह्या लेखाचा मी केलेला प्रतिवाद १५ मे२०१६च्या लोकसत्तेच्या अंकात प्रकाशित झाला तो ब्लॉगवर प्रकाशित करीत आहे! 

मराठी चर्चाविश्वातील ज्येष्ठ अभ्यासक व बहुचर्चित लेखक प्रा. शेषराव मोरें ह्यांचा ११मे रोजीचा संस्कृतिसंवाद ह्या सदरातील ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ ह्याविषयावरील लेख वाचल्यावर त्या लेखातील मांडणीविषयी काही शंका निर्माण झाल्या व त्याअनुषंगाने प्रस्तुत लेखप्रपंच करावा वाटला. डॉ. शेषराव मोरें ह्यांच्या ‘लोकसत्ते’सारख्या अग्रगण्य दैनिकातील संबंधित सदराविषयी खरेतर मराठी अभ्यासविश्वात सांगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाल्याचे दिसत नाही.

संबंधित लेखाचे ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ हे शीर्षक पाहाता शीर्षकाविषयी व लेखामागील हेतूविषयी काहीशी संदिग्धता किंवा अस्पष्टता जाणवते तीकडे आधी पाहू. एकूण लेखाचा सूर भारतीय गणराज्याला एक कोणतीतरी राष्ट्रभाषा असावी आणि ती संस्कृतच असावी असे मांडणे हा असावा असे (डॉ. मोरे तसे विधान उघड करत नसले तरी) दिसते. शीर्षकाचा विच…
सांता क्लॉज स्तव:

ख्रिस्तस्य देवपुत्रस्य जन्मोत्साहे सुपर्वणि | ग्रामं ग्रामं प्रयात्येष: सांता क्लॉज निकोलस: ||१||
: During the enchanted, festive season of Christmas, Saint Nicholas/Santa Claus embarks on his journey and visits every village and town across the globe.

इतालीयोऽपि यो विश्वे सर्वभू: सर्वगोचर: | बालानां सुखमोदार्थं नानादेहप्रवेशकृत् ||२|| : He, having hailed from Italy, is omnipresent and embodies himself in different forms to please the children.
लम्बोदरो मृगरथ: युरोपऋषिसत्तम: | उत्तरध्रुववासोऽयं विविधोपायनप्रद: ||३|| :Santa Claus, one of the greatest saints of the Europe, is the bestower of several gifts. He who's abode is located on the North pole, has a large protuberant belly. He rides the chariot pulled by reindeers.
श्वेतश्मश्रु: श्वेतवर्ण: श्वेतभ्रु: श्वेतलोचन: | रक्तवासानुरक्तश्च सोऽयं रक्तशिरस्त्रधृक् ||४|| He has a long white beard, fair pale complexion, white eyebrows and white eyes. He loves red costumes and covers his head with a red hat.
चाकलेहं क्रीडनकं नानारससुप…

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

Image
मांडणीसाठी विशेष आभार: संहिता-अदिती जोशी
स्वीय प्रस्तावनाकितेक दशकांच्या झोपेतुन,बहुदशकानां गभीर शयना-पिशी मावशी जागी झाली,दुत्थिता हि डाकिनी पिशी सा।जागी होऊन हर्षोन्मीलितमृतयोन्यामप्यमृततत्त्वा-रसिक-हृदातून पिंगा घाली।।१।।दमृतवाण्या पुनर्मिलति सा।।.अफाट प्रतिभेच्या अर'विन्दा'-शोभनार’विन्दा’कार-चितौ-तुनी प्रकटली 'कृत्ये'मधुनी,‘कृत्या’यामाविर्भूतेयम्।आज पुन्हा संजीवन लाभुनपुन: प्रकटिता मत्त: खलुडोकावित ही अधून-मधुनी ।।२।।सिसृक्षा-संजीविनिकलितेयम्।।.मात्र टिकोनी आहे बर कापरन्तु रसिका जानन्तु च यत्-तिचा तोच तो खट्याळ नखरा!अद्याप्येव तथैवात्यक्ता:।प्राकृतातुनी संस्कृत होऊनबाल्यास्पद-लीलास्तस्यास्ता:पुन्हा तोच आनंद दे खरा।।३।।संस्कृतायिता: प्राकृतमत्ता:।।


पिशीमावशीच्या पोथ्यापिशी डाकिन्या: पांडूलिप्यध्ययनम्मध्याह्नीच्या नंतर रात्रीसायंकाले रात्रावथवा-मावळल्यावर चंद्र कधीही,पीयूषांशौ क्वचिदस्तमितेपिशी मावशी चष्मा घालूनउपलोचनधृक्पिशी डाकिनीजुन्यापुराण्या पोथ्या पाहीपाण्डूलिप्यध्ययने रमते।.रोज वाचते वेताळविजय'वेताल-विजयकथां' पठति साअन् 'भस्मासूरप्रताप' नंतर,भस्म…

रोमन इतिहासास...

Image
मध्यंतरी इटलीला जाऊन दांते, मेकीयाव्हेली, मायकेल अँजेलो, गॅलिलिओ ह्यांची टोंबस् आणि त्यांची कला-ज्ञानसाधना 'याचि देही..' बघून आलो. वसंत बापटांचं मायकेल अँजेलोपनिषद इथे अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन अनुभवलं ! केवळ अद्भूत, अलौकिक..!! रोममध्ये भटकताना रोमन साम्राज्याचा, माझ्या आवडत्या ज्युलियस सीझरचा इतिहासही (पुलंच्या) 'हरीतात्यां'च्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला...!
प्रबोधनाच्या देशात जाऊन आल्यावर मर्यादा झिडकारून देण्याचं बळ मिळावं इतकं स्थानमाहात्म्य इथे आजही आहे..!  त्यानिमित्ताने काही स्फुरलं, ते लिहिलंय..: ----------------------------------
हे भग्न खांब कलथले; उलथली मूर्ती, भग्नशा भिंतितून साक्ष जुन्याची पुरती, या साक्षींच्या शाहिरा गवसले काय..? इतिहासासम वर्तमान घडतो हाय...!
तो शूर रणांगणि खुर्दा पाडुन गेला, त्या क्रूर शत्रुचा मुर्दा पाडुन गेला, एकछत्र तो स्थिर सत्ता देण्या जाई, मित्रांनीही त्या जिते ठेवले नाही...!
हा भव्य असा इतिहास सांगुनी जाई, मम चरित्र लिहिण्या रक्ताची हो शाई, ते वाच-वाचुनी जबरदस्त अन् पगडा; आकंठ माखुनी समाज तरिही उघडा...!
ही भव्य-भग्न मूर्ती अन् हुरहुर साहे, &#…

आरती अँग्लो पाक्-हिंदुस्थानाची

'आसिंधुसिंधू वगैरे हिंदुस्थान' किंवा 'आमची अनादि-अनंत महान संस्कृती'  वगैरे पोकळ गफ्फांना वैतागून, 'अध्यात्म-धर्म' वगैरेच्या बाजाराला विटून, इतिहासादिंविषयीच्या वृथा अभिमानाचे डंके असह्य होऊन, आणि इतिहासाच्या सत्या-सत्यतेच्या राजकारणाला बलपूर्वक चरणस्पर्श करून...
देवतांना माणसाळवणाऱ्या वग-नाट्यपरंपरेतील शाहिरांना स्मरून, पुरोगामी न्यूज-चॅनल अँकर्सच्या उच्चभ्रुत्वनिदर्शक आकांडतांडवी 'आगळ्यावागळ्या' वर्तमानाकडे सक्रोध कटाक्ष टाकून, मार्क्सवादी-समाजवाद्यांच्या सुखासीन होत गेलेल्या इतिहासाला दुर्लक्षित करून, आजकाल बहुतांशवेळेस केवळ मौखिकव्यापारासाठीच औचित्यपूर्ण ठरत असलेल्या त्यांच्या  विद्वत्तेला स्मरून व जगातील वास्तवे नाकारत आपल्या विश्वात रमणाऱ्या हस्तीदंती घरांतल्या विचारवंतांना हाड्ड म्हणून...
इतरांना भोचकपणे खिजवत सुखाने जगणाऱ्या हॅप्पि गो लकी ड्यूड्स् वगैरेंना विनम्र अभिवादन करून आणि पुरोगामी-प्रतिगामी-धार्मिक-नास्तिक-कम्युनल-नॉनकम्युनल अशा सर्वांच्या अहंकारांना चुचकारून दक्षिण-आशियायी इतिहास-धर्म-भाषा विषयात काम करणाऱ्या, आटपाट नगरीत उञ्छ-वृत्ती…

इतिहासाचं वर्तमान-भविष्य!!

आज ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ.ब्रह्मानंद देशपांडे गेल्याची दुर्दैवी बातमी आली!! संस्कृताभ्यासक डॉ. प्र.शं. जोशी (डॉ.आंबेडकरांच्या देदीप्यमान आयुष्यावरील 'भीमायन' या महाकाव्याचे कर्ते), डॉ.शि.द. जोशी (विख्यात वैयाकरण) अन् डॉ. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर (मराठी व्याकरणकार, संस्कृतपंडित व कवी) या थोर प्राच्यविद्यापंडितांच्या एका पाठोपाठ एक जाण्याने झालेलं दुःख अधिकच गडद झालं! तसं साधारण एकाच वयाची, पंच्याऐंशी-नव्वदच्या आसपास वय असणारी ही मंडळी! आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेल्या ह्या अभ्यासकांकडून कधीनाकधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिकण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. त्यांच्या जाण्याचं दुःख हे अगदी आप्तस्वकीय गमावल्याचंच दुःख!
हल्लीच्या काळात अभ्यास क्षेत्रात; त्यातही इतिहास-भाषा क्षेत्रात घुसलेल्या, राजकारण्यांना जातीय व्होटबँक मिळवून देण्यासाठी तत्पर असलेल्या, एकास एक 'सर' अशा स्वयंघोषित, भुरट्या, 'अभि-जात'वादी 'अभ्यासकां'(?)च्या वाढत्या उपसर्गाचे फेसबुकादि माध्यमांतून होणारे उन्मुक्त प्रकाशन आणि छछोर, अॅकॅडमिक शिस्त नसलेली, बुद्धिभेदजनक संशोधने बघून…