Posts

Showing posts from November, 2012

श्रीमद्वडापावरेसिपी-दशकम्|

Image
अखिल महाराष्ट्र-भूमीतील लोकांची क्षुधा शमविण्याचे महत्कार्य करणारा वडापाव म्हणजे आमचा जीव की प्राण! गेल्या एक वर्षापासून दूर युरोपातल्या एका शहरात राहत असताना कुटुंब, मित्र, सह्याद्री, आणि आमची प्राणप्रिय अशी पुरणपोळी ह्यांच्यासोबतच आम्ही सर्वात जास्त मिस करत असू तो हा वडा-पाव!  मध्यंतरी आम्ही स्वयंस्फूर्तीने बटाटवडे करायचे काही यशस्वी प्रयोग केले! त्याच प्रयोगांच्या वेळी कराव्या लागलेल्या करामतींचे व 'वडापाव' या व्यंजनाचे धार्मिक, पारलौकिक व सामाजिक औचित्य अगदी आपल्या रोजच्या बोलीभाषेत पटवून देण्याचा हा वृत्तबद्ध प्रयत्न!


वृत्त: शार्दूलविक्रीडित, (चाल : रामो राजमणि: सदा विजयते) 


वीकेंडी दरवेळि मी ठरवतो खावे बटाटेवडे, ओल्या नारळ-मिर्चिची चटणिही त्याच्या सवे आवडे, फाडूनी मधुनी मऊसर असा तो पाव बेक्रीतला, खाऊया चविने असे म्हणिन तो, पाणीच जिह्वा-तला*[१]||             
ऐसे हे ठरवोनि मी निघतसे पेनी-रिआलच्या[२] दिशे,                  कांदे आणि बटाट-कंद पिशवीतूनी आणाय्च्या मिषे,
आणोनी, धुवूनी तयां नळ-जले शिज्वितसे कूकरी शिट्ट्या कर्णपथीही चार पडती शिज्ताच हॉट्-प्लेट्वरी 
काढोनी कुकरातुनी शिजविल…