Posts

Showing posts from April, 2013

संघ नको, कॉंग्रेस नको...

संघ नको, कॉंग्रेस नको माझ्या नावे मम पक्ष हवा, पक्षाध्यक्षहि इथली थुंकी तिथे लावण्या दक्ष हवा|
मंत्रीगण-सहकारि नको एकट्यास सगळा भोग हवा, प्रचारामध्ये जाहीराती करण्यासाठी योग हवा|
असेल गौतम, नको बुद्ध तो, अदानी परी चुस्त हवा, अनिल आणि मुकेशापरी सपोर्टर कसा मस्त हवा!!
मीडीया मम दास असावा, प्रसिद्धीचा मज सोस हवा,  वाट्टेल तशा थापा फेकिन, भाषणात परि जोश हवा|| 
अंध भक्त अन सपोर्टरांचा पाठिंबाहि अलोट हवा, त्यांच्या अंगी माझी नावे विणलेला तो कोट हवा|
अदानीकडून अर्थ हवा, हेलीकॉप्टरचा खर्च हवा, हिंदू धर्माच्या नावे मज व्होट बँकचा चर्च हवा|
गांधींसम ब्रँडँबेसेडर प्याद्यावरती क्लेम हवा, पटेल-पुतळा लिबर्टिच्या पुतळ्यासम सेम हवा|  
ओबामा येवो पुतीन वा जिथे तिथे मज मीच हवा, मला हवे ते तसे खेळण्या ओबडधोबड पीच हवा|
 © हेमंत राजोपाध्ये

जागतिक स्तरावरील डेलिबरेट हिडीस भिकारकाव्य

शीर्षक: समांतर-तत्त्व!! छंद: उन्मुक्त
धुंद अशा पहाटवेळी साखरझोप मोडणारी ही सु-सु, बाहेर पडायच्या वेळी सुरु होणारा पाऊस किंवा स्नो-च्या फ्लरीज्! केबिन लॉक करताना कॉपीरायटरला येणारं अर्जंट जाहिरातीचं ब्रीफ.. आवडत्या मुलीची आणि आपली जुळून येणारी सगोत्रता..! यांच्यात दिसून येतं एक तत्त्व, समांतरत्व..!!

पावसाला जायची घाई असलेली चेरापुंजी आणि पोटाच्या हलक्या स्वप्नांचे एकमात्र लक्ष्य असलेले डेस्टीनेशन अर्थात् संडास! लग्नाळू मुलाला एकामागून एक मुली बघायला लावणारं लग्न आणि साडे-पाच वाजता घाईत धावत पकडायचा, ठरलेला लोकलचा डबा! यांच्यातही दिसून येते तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व..!!

अनामिक हुरहुरीने अस्वस्थ होणारं मन आणि विदाउट तिकीटवाल्यांना टीसी दिसल्यावर येणारी अस्वस्थता! गर्दीत ढूसकुली सोडणारे आपणच आहोत हे कुणाला कळेल म्हणून भांबावून जाणारं मन, आपल्या फेसबुक-पोस्टला 'तिचा' लाईक येईपर्यंत नव्या फेसबुकीला येणारं फिलिंग! यातही असतं तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व!!

म्हणून आयुष्य हे कायमच समांतर जात असतं..डोक्यावरून जाणाऱ्या एका नवकवितेसारखं..! आणि आपल्याला ते झक मारत जगावं लागतं एकाकीss !

शू…