Posts

Showing posts from 2016

कशासाठी? देशासाठी... दोन-हजारी नोटांसाठी...

कशासाठी? देशासाठी..  दोन-हजारी नोटांसाठी..

चला शोधू ब्लॅकमनी मल्ल्याची, पण, धुवू धुणी पंप्र बोले टीव्हीवरी भक्त ओरडे 'फेबु'वरी कोऱ्या नोटा हाती धर कार्डाचाही use कर कॅश येणे बंद झाली एटीएमची काशी, साली!!  थडथड ठ्यांवठ्यांव
सीमेवर उभं ऱ्हावं
सेनेमध्ये नाहीत त्यांनी, 
रांगेत करा झक-मारी 
 कळ काढा थोड्यासाठी
कशासाठी? देशासाठी...

भरडावे दीन-जन
अदानीची होवो चैन
एटीएम हे भरात
लोकांची निघे वरात
कमळाचे दल डोले
चिखलाने भरे तळे
मोदी जाती जपानात
'रेड्डी' नाचे लगनात
काळेपैशेवाला भाऊ
त्याच्या सवे दारू पिऊ
जनता अनोशापोटी 
कशासाठी? देशासाठी..


-हेमंत राजोपाध्ये

डॉ. शेषराव मोरे ह्यांच्या ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ ह्या लेखाचा प्रतिवाद

प्रा. शेषराव मोरे ह्यांच्या ११मे २०१६रोजीच्या लोकसत्तेत प्रकाशित झालेल्या ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ ह्या लेखाचा मी केलेला प्रतिवाद १५ मे२०१६च्या लोकसत्तेच्या अंकात प्रकाशित झाला तो ब्लॉगवर प्रकाशित करीत आहे! 

मराठी चर्चाविश्वातील ज्येष्ठ अभ्यासक व बहुचर्चित लेखक प्रा. शेषराव मोरें ह्यांचा ११मे रोजीचा संस्कृतिसंवाद ह्या सदरातील ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ ह्याविषयावरील लेख वाचल्यावर त्या लेखातील मांडणीविषयी काही शंका निर्माण झाल्या व त्याअनुषंगाने प्रस्तुत लेखप्रपंच करावा वाटला. डॉ. शेषराव मोरें ह्यांच्या ‘लोकसत्ते’सारख्या अग्रगण्य दैनिकातील संबंधित सदराविषयी खरेतर मराठी अभ्यासविश्वात सांगोपांग चर्चा होईल अशी अपेक्षा होती, मात्र तसे झाल्याचे दिसत नाही.

संबंधित लेखाचे ‘संस्कृत भाषेचे ऐक्यासाठी योगदान’ हे शीर्षक पाहाता शीर्षकाविषयी व लेखामागील हेतूविषयी काहीशी संदिग्धता किंवा अस्पष्टता जाणवते तीकडे आधी पाहू. एकूण लेखाचा सूर भारतीय गणराज्याला एक कोणतीतरी राष्ट्रभाषा असावी आणि ती संस्कृतच असावी असे मांडणे हा असावा असे (डॉ. मोरे तसे विधान उघड करत नसले तरी) दिसते. शीर्षकाचा विच…