Posts

Showing posts from December, 2016

कशासाठी? देशासाठी... दोन-हजारी नोटांसाठी...

कशासाठी? देशासाठी..  दोन-हजारी नोटांसाठी..

चला शोधू ब्लॅकमनी मल्ल्याची, पण, धुवू धुणी पंप्र बोले टीव्हीवरी भक्त ओरडे 'फेबु'वरी कोऱ्या नोटा हाती धर कार्डाचाही use कर कॅश येणे बंद झाली एटीएमची काशी, साली!!  थडथड ठ्यांवठ्यांव
सीमेवर उभं ऱ्हावं
सेनेमध्ये नाहीत त्यांनी, 
रांगेत करा झक-मारी 
 कळ काढा थोड्यासाठी
कशासाठी? देशासाठी...

भरडावे दीन-जन
अदानीची होवो चैन
एटीएम हे भरात
लोकांची निघे वरात
कमळाचे दल डोले
चिखलाने भरे तळे
मोदी जाती जपानात
'रेड्डी' नाचे लगनात
काळेपैशेवाला भाऊ
त्याच्या सवे दारू पिऊ
जनता अनोशापोटी 
कशासाठी? देशासाठी..


-हेमंत राजोपाध्ये