Posts

Showing posts from June, 2012

पूर्वमेघ

"आषाढस्य प्रथमदिवस:|" अर्थात कालिदास दिन! आजच्या ह्या विशेष दिनी ब्लॉगद्वारे लिखाण करण्याचा प्रयत्न सुरु करत आहे! केवल भाषा-साहित्य-इतिहास-धर्म-संस्कृती-समाजशास्त्र अशा माझ्या नेहमीच्या व आवडीच्या विषयांत न अडकता मनातील विचार, अनुभव, टक्के-टोणपे, तथाकथित सभ्य शिष्टाचारी सोवळ्या मनांना क्वचित आवडणार नाही असे आमची अंगभूत टगेगिरी दाखवणारे लिखाणही ह्या ब्लॉगाद्वारे आपल्यासमोर येईल!  या वेळचा हा भारताबाहेर पहिलाच कालिदास दिन! भारतात असताना कधी फर्ग्युसन महाविद्यालयात तर कधी खोपोलीला घरी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कालिदास दिनासाठीच्या सभेत काही नं काही वाचन होत असे..! कधी जाहीर तर कधी स्वतःपुरते! आज तो नेम न मोडता इथे हां वार्षिक परिपाठ-प्रपंच! श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसे  "तेथ अभिप्रावोचि अभिप्रायाते विये| भावाचा फुलौरा होत जाये| मतीवरी||"  ह्यानुसार लिहीत राहेन..चालत राहेन... आपल्या अभिप्रायातून, मार्गदर्शनातून अधिकाधिक ज्ञान, आनंद  गवसेल ही खात्री आणि '