फेसबुक-अडिक्ट पिशीमावशी
भारतात गेल्यापासून एकुणात ऑनलाईन कमीच होतो! तिथे बरीच भटकंती झाल्यावर पुन्हा इथे आलो आणि फेस्बुकावर, जी-मेलवर एक्टिव्ह झालो. ब्लॉगावर काहीही न लिहिल्याची जाणीव मनाला खात असतानाच हि बया, पिशी आठवली! साधारण एक वर्षापूर्वी डोस्क्यात आलेली ही पिशीसुद्धा जालावर यायला उतावीळ झाली. आता तिला 'नाही' म्हणणं अवघड आहे. घ्या, झेला या पिशीला! कितेक दशकांच्या झोपेतुन, पिशी मावशी जागी झाली, जागी होऊन 'हर्षो'न्मीलित रसिक-हृदातून पिंगा घाली||१|| अफाट प्रतिभेच्या अर'विन्दा'- -तुनी प्रकटली 'कृत्ये'मधुनी, आज पुन्हां संजीवन लाभुन डोकावित ही अधून-मधुनी ||२|| मात्र टिकोनी आहे बर का तिचा तोच तो खट्याळ नखरा! मानगुटीवर बसुन लिहविते हर्ष मनातुन रसिकास खरा||३|| थयथयाट तो तसा होऊ दे पिशे;मनातुन पुन्हा अमुच्या, जागव पुन्हा अल्लड, हुल्लड आठवणी त्या जुन्या कालच्या||४|| आता पिशे तू उडाणटप्पू पुन्हा-पुन्हा ये भेटायाला, फेसबुकावर टगे-सोयरे सज्ज तुला हे खेटायाला ||५|| पिशी मावशी बर का कळले शाप तुला माती खाण