आम्ही कोण...?
आज, दिनांक २७ ऑगस्ट २०१२च्या लोकसत्तेत आलेल्या लेखावरून प्रेरित होऊन झालेले केशवसुतांच्या कवितेचे विडम्बन! खूप दिवस हा विषय डोक्यात होताच.. आज ह्या संपादकीयामुळे किल्ली बसली, आणि एकटाकी लिहून काढलं ते इथे पोस्ट करतो ! 'प्रस्थापित म्हणवून घ्यावे लागणाऱ्या' समस्त सरकारी सारस्वतांप्रत समर्पित : आम्ही कोण म्हणोनि काय पुससी ह्या अग्रलेखातुनी ? श्रोत्यांनी जग व्यापिलेच अवघे आम्हांस भटकायला, विश्वी राजकवींपरि विचरतो सर्वत्र हो लीलया सरकारातुनी कार्यभार मिळवू आम्ही 'महामंडळी'*, सारा हि बडिजाव येथ मिरवू, उचलू 'टग्यांची' तळी 'पाणि'स्पर्श हि राजकारणि महानेत्याकडुन् मागुया ''मोठाले अनुदान?'', ते हि मिळवू; संमेलनालागि या फोले पाखडिता क्वचित् दिसतसे नि:स्वार्थी आम्हांमध्ये सारे काही मिळोनि हो दळिदरी आम्हीच विश्वामध्ये कोट्यातून न लाभले घर असा; वा लाभ कसला उगी; 'एस्.टी.-ट्रेनमधूनी त्या सवलती ना घे असा' ना जगी 'लाभे स्वास्थ्य न' हे म्हणौनी प्रतिभा ती पाजळू, श्रेष्ठता