मधुशाला

उमर खय्याम यांच्या रुबाया वाचून, त्याने भारलेल्या प्रयाग (अलाहाबाद) येथील हरिवंशराय 'बच्चन' नामक एका तरुणाने  त्या रुबायांच्या धुंदीत हिंदी कवितेला एक अनमोल प्रातिभ-रत्न प्रदान केलं. छायावादी कवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या बच्चनांच्या या मधुशालेच्या शेकडो आवृत्त्या निर्माण होऊन हि मधुशालेच्या मधुरसाचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. मदिरा जुनी होत जाते तशी ती अधिक रुचकर होऊन जाते..तिची मादकता वाढत जाते असं म्हणतात. या मधुशालेचे मराठी, कन्नड, तेलुगुपासून ते अगदी देववाणी संस्कृतमध्येही तिचे अनुवाद झाले आहेत. 

वयाच्या १५व्या वर्षी माझ्या हाती ही मधुशालेची अक्षय्य सुरई लागली, ती गंगेच्या काठी, वाराणसी येथे असताना!  आयुष्यातला '३१ मे'चा तो दिवस..मी कधीही विसरू शकत नाही! त्या दिवशी जो हा प्याला तोंडाला लावला, तो अजून प्यायचा थांबलोच नाही. रोज 'शुभं करोति..' म्हटल्याप्रमाणे मी त्यातल्या रुबाया नित्यनेमाने म्हणू लागलो. बघताबघता त्या तोंडपाठही झाल्या! त्यात पौगंडावस्थेचे ते वय! फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर वयानेहि आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. तिथल्या कट्ट्यावरच्या एका हास्यावर लुब्ध होऊन मधुशालेची झिंग अश्शी द्विगुणित झाली.. आणि मग त्या धुंदीचे परिणाम हि जाणवू लागले..! 

पण शेवटी...मधुशालाच ती...! अति झाले की उध्वस्त करणारच!  व्हायचे ते परिणाम झालेच..! अजूनही ती मस्ती ठेचा खायला लावते... धक्के देत राहते...'त्याच' रस्त्याच्या कोपऱ्या-कोपऱ्यावर न चुकता रोजच्या रोज आमचे आडवे पडणे अगदी आजही सुरु आहे...! आणि नवीन रस्ते मानवत नाहीत.. कारण त्या मधुशालेप्रत असलेली निष्ठा, ती मस्ती.. धुंदी काही उतरायला तयार नाही..! उतरणारी झिंग नाहीच ही...! पण आता त्या मस्तीमध्येही सावधपणा आलाय..जाणीव आलीय...! वाढत्या वयानुसार, जबाबदारीच्या जाणीवांनुसार आणि परिस्थितीनुसार ती हल्ली मधून मधून आचके देते..पण जायचे नावं काढत नाही! (बाकी वास्तवात 'मदिरापान' आम्ही कधीही केलेले नाही हे मुद्दाम नमूद करतो. स्वतः बच्चन यांनी हि मदिरापान केले नसल्याचे त्यांनी मधुशालेत म्हटले आहेच)

असो..तर सांगायचे असे, की त्या बच्चनांच्या मधुशालेच्या नशेत असतानाच काही १००-१५० रुबाया माझ्या मुखातूनही त्या काळात बाहेर पडल्या! तेव्हा तर त्या 'बाहेर पडत' म्हणजे काय..अक्षरश: असं एका-दोन सेकंदात सबंध रुबाई पूर्ण होई...फेरफार करायची गरजच पडत नसे! सगळी मजा होती तेव्हा! १७-१८ व्या वर्षी केलेल्या त्या कविता, त्यांचा अल्लडपणा, त्यांच्यातली भाषिक अप्रगल्भता आजही  सुखावून जाते. त्या आमच्या रुबाया ऐकून ऐकून बेजार झालेले काही मित्रही रुबाया लिहू लागले अशी अनेक उदाहरणे मी सांगू शकतो! ती धुंदी एवढी होती की पुढे 'शूट आउट एट लोखंडवाला' ह्या सिनेमातील 'गणपत..चल दारू ला..' हे गाणे हि मी


'ए गणपत तू बन जा साक़ी, 
पिला मुझे प्रिय मधुहाला,
मेज-वेज लाना और रख दे;
उस पर मादक मधुप्याला, 

पीकर हाला मुंबापुरि और 
पूरे भारत पर मिलकर,
चल भाई बन राज करेंगे,
मदमाएंगे मधुशाला..||"

ह्या चालीत री-राईट केले होते. पण हे लिहून झाल्यावर रांग-रंग बरे दिसत नाहीत हे लक्षात आले..आणि काही काळ मीच माझ्या पेनची निब मोडून टाकली... आणि ही गिरणी थांबवली! अर्थात्, काही काळाने पुन्हा नित्य-नेमाने रतीब सुरु  केलाच आणि तो आजवर चालू आहे!

असो...(मधुशालेतील ) मदिरा पिऊनही श्रीशारदेचा हा असा आशीर्वाद कायम असणे, हे मादकतेवर व 'त्या' मधुशालेवर असलेल्या माझ्या अविचल निष्ठेचे फळ आहे असेच मी समजतो! या धुंदीमुळे माझ्यातला कवी-लेखक जागा झाला, जाणीवा जागृत झाल्या..संवेदनांना धार आली. म्हणूनच आज जे काही हातात आहे त्यात मधुशालेचे श्रेय सर्वाधिक आहे हे मी नि:शंकपणे व अभिमानाने मांडू इच्छितो! तसे खाली एका रुबाईत म्हटलेही आहे.

त्या जुन्या शे-दीडशे रुबायांपैकी काही मोजक्या रुबाया आपल्या समोर आज ठेवतो. 'अगदी प्राज्ञ हिंदी आहे..' वगैरे टिप्पण्या मी आधीपासूनच ऐकल्या आहेत..त्या काळात माझ्या लिखाणात संस्कृतप्राचुर्यहि जरा जास्तच होते याची जाणीव आज होतेच आहे. त्यामुळे 'अशा सर्व' टिप्पण्यांची मला सवय आहे! तेव्हा टिप्पण्या करण्यात कसलीही कसर सोडू नये! १९-२० वर्षांच्या वयात लिहिलेल्या या कवितांतील काही भाषिक, वृत्तासंबंधीचे धांदरटपणातून झालेले दोष व क्वचित् ठिकाणी मांडणीतले ढिसाळपण चाणाक्ष जाणकारांच्या नजरेतून सुटणार नाही. पण ते दोष त्या मदिरेच्या धुंदीतले असल्याने आम्ही ते बदलले नाहीयत! कारण त्या चुका हेच त्यांचे पावित्र्य आहे, त्या धुंदीतल्या या ठेचा आहेत. अस्सल, जातीवंत शौकीनाला आपल्या अशा चुका, ठेचा आवडतात, त्या चुका तो पुनःपुन्हा करतो आणि त्या खड्ड्यात तो पुन्हा पुन्हा ठेचकाळतो. असो..! "न्यून ते पुरते| अधिक ते सरते||" करवून घ्यावे किंवा न घ्यावे आपली मर्जी!






श्रेष्ठ पूर्व-प्राशक वितरक से
मैने पाया है प्याला,
सीखा है उस मधूमत्त से,
कैसे वितराए हाला,

अर्ध पान से मत्त वहां से,
घट, दो घट बस, मै लाया,
मूल स्रोत है नित्य पूर्ण,
हरिवंशराय कि मधुशाला|| 




प्याले में वितरा मधुजल यह 
ना कभी लौट दिया जाता,
अंगूरी हाला से उस
ना अंगुर फिर पाया जाता,

देखो निर्णय करना है अब 
समय तुम्हारे हात रहें,
अंगुरवल्ली कांक्षित है? या;
कांक्षित है तव मधुशाला?





मै बनता हुं केवल साकी, 
तुझको बस पिलवाता हुं,
हाथों मे आया प्याला बस,
तुझको मै दिलवाता हुं,

हाला का निर्माता कोई,
बरसाए मेरे मन से,
निमितमात्र मै केवल हुं,
कर्त्तृत्व किसी का मधुशाला||





विभिन्न मुद्राओं को धारण 
कर छलके मधु का प्याला,
विविध रसों के निर्माणो में
अब भी व्यग्र रही हाला,

ज्ञात न किसको दिल अखियो में
क्या छाया है साकी के,
सर्व क्रियाओं की और यश की
मूल प्रेरणा मधुशाला||





मधुपिपासु क्यो चिंता करता,
'कैसे अब हम पान करे?'
क्यों मन उसका चंचल बनता;
'अब यह प्याला कौन भरें?'

कितनी कूट समस्याएं हो, 
पलक झपकते सुलझाती...
विभुविश्वास, तृषा रख जारी,
आविर्भूत हो मधुशाला||





तृषा रहेगी जितनी तेरी 
उतनी रे पीना हाला,
जितना भरता हो बिन उछले,
उतना हि भरना प्याला,

अधिक पान कर अति-प्रमत्तता
हानीकारक होती है,
पर जरूर पीना जितनी हो,
तृषा तुम्हारी मधुशाला ||






आखों मे अब केवल साक़ी,
उसके हाथों का प्याला,
राह फेरता दिखे सदा यह,
हाथ लिये यश कि माला,

अनन्त संकट, शत्रूमार्ग, पर
तृषा हमारी तीव्र रहें,
पाएंगे हम सहज सुशोभित 
कांक्षित ध्येय मधूशाला||





साकी मन मे जिसके हो.
या जिसका मन हि साकी हो..
साकी में जिसका मन हो..
या साकी हि जिसका मन हो.. 

कैसा निर्णय करता कोई,
मुझको कोई फ़िक़्र नही..
'समास' कोई, मास कोइ,
नित मै 'मनसाक़ी' मधुशाला||





सूना भग्न पडा मदिरालय,
भग्न भित्ति; पत्थर पाला,
वेलों की विटपों की नक्षी,
उस पर अब तृण की छाला,

ऋद्ध अतीत, समृद्ध भविष के 
चिंतन मे खोया रहता,
लाल सुरा पी भग्नप्याल मै,
साथ मत्त यह मधुशाला||





"अमृत पिते है हम" कहते जन,
उनको क्या समझाए?
मृत्युलोक है वास्तव अपना 
कैसे उनको बतलाये?

अमृत पीना जाने सुरगण, 
मनुज योग्य बस है हाला
अमृतशाला अमरलोक में,
मृत्युलोक में मधुशाला||







कलकल, छलछल मन्थननिर्मित,
हालाहल अमृत-हाला,
अमृत पीने की मस्ती में,
सुर-दितिसुत पी मधुप्याला,

मधुनिर्माता को विष देते;
शांत रहें पीता फिर भी,
सावधान सूर-असुरगणो,
शिव-प्रलयंकारी मधुशाला||






अब तक पिते थें हालाहल,
अब पीते है हम हाला,
दीर्घ-विरह में घुमें अर्जुन-
हो पाई साकीबाला,

विष पीकर भी अमृत रहना-
शिवजी का हक़ होता है,
हम है शिवसुत हम हि सदाशिव,
सदा शिवा है मधुशाला||







क्या मेरे हि किसी दर्द से 
उभरता हुआ है प्याला,
या अन्तर के किसी आग की,
चंचल लपट बनी हाला,

किसी विस्मृती के हर पल
यादों की मूर्ती है साकी,
या शमशान विरागी मुझको 
बहलाने है मधुशाला||






आयु भस्म से अंकित होकर,
नाच रहा लेकर प्याला,
मदहोशी में सर-कपाल को 
बनवाऊ मधु का प्याला,

नित्य-निरंजन आत्मा की 
इस विकट योनी में आकर भी,
याद रही है मदिर-पिपासा,
बुला रही है मधुशाला||







सूरज की है मूल रोशनी,
ना चमके चंदाबाला,
सागर का पी बाष्परूपि जल,
बरसे मेघों की माला,

वह मधु-प्राशक का मद है,
जिससे साक़ी मदमाता है,
तेजोनिधियों से प्रतिबिंबित,
ना तेजस्विनि मधुशाला||







विचार के संतत प्रवाह का 
कारण है अमृत हाला,
कृत्य न उत्छ्रुंखल कोई,
छलके बाका अनपढ प्याला,

चिंतन में है एक निरंतर 
मोहक सुज्ञ मधूसाकी,
यह जीवन ना जीवन; 
अंतर्यामी कविता मधुशाला||






अपने मन के क्षीण तरंगो से
गरजे सागर प्याला,
सुखे पंखुडियो से ढकती,
कमलदलों की है माला,

तोड-फोड कर प्रारब्धों के, 
भीषण आविष्कारों को
भीतर सुख के घट समेट कर 
बंद पडी है मधुशाला||




प्राशक भूल गया मस्ती में,
हाथों में रक्खा प्याला,
साकी का स्तब्धत्व विवंचक,
औ' हाथों में है हाला,

अहंकार मद की मस्ती में
और नशीला तम छाएं,
और नशीली होने से अब 
डरती है यह मधुशाला||



विधिइच्छा से नत होकर
हम छोड रहें है बस प्याला|
नक्त पान से मत्त बने जब-
क्यो छोडे पीना हाला?

समय प्रबल तो नित होता है,
तृषा अगर बलवत्तर हो,
प्याले से ना घट से ही,
विभु पान कराएं मधुशाला||

-हेमंत 


Comments

  1. व्वा हेमंत. मस्तच आहे तुझी मधुशाला. समजलं समजलं फर्ग्युसनच्या कट्ट्यावर काय झालं ते. :-)
    काश मला देखिल या काव्यांमधलं थोडं थोडं समजत असतं. माझं म्हणजे अगदी गा.ला गु.ची च.का. असं झालेलं आहे. :-)

    ReplyDelete
  2. झकास लिहिले आहे

    ReplyDelete
  3. क्या बात है ..
    झिंगण्याची झिंग देते ही मधुशाला
    जगण्याचे मंत्र देते ही मधुशाला !!!

    ReplyDelete
  4. महागुरू हेमंत महाराज आम्ही नतमस्तक तुमच्या लेखणी समोर

    ReplyDelete
  5. साकी हाला बाला कह करके
    हो जाऊ फेरीवाला
    बेच बेच के लेलु उनका
    दाहकदुख , और श्रमसारा
    दे जाऊ उनको मदिराकी
    मोहकता मद मस्ती की
    ये करेगा और प्रसारण
    नव पन्थ बने यह मधुशाला ......

    ReplyDelete
  6. सुप्त प्रतिभेचा दृश्य अविष्कार अजून काय बरे असू शकतो ?

    ReplyDelete
  7. जबरदस्त लिहिले आहेत .....भारी आवडले .....

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

पूर्वमेघ

जय हो...