जय हो...
पुन्हा एकदा नवी बातमी,
पुन्हा एकदा आम आदमी
पुन्हा एकदा पाळू मौन
सुरक्षा व्यवस्थेची जावो रया,
इकडे बघा, महागायक
पवित्र वचने, दिव्य श्लोक,
आणि जाऊ भाव खाऊन...
पुन्हा मेणबत्त्यांची यात्रा,
पुन्हा 'जंतर-मंतर', जत्रा!
आणखी एका पुतळ्याचा भंग,
आणि आमचा जातीय रंग...!
पुन्हा एकदा छत्रपती हिरो
गांधी? ह्यांच्या दृष्टीने ते तर झीरो,
सावरकर तर दुर्लक्षित,
आमी नाय कोनाला भीत...!
फुले-टिळक-आंबेडकर,
छत्रपती अन आगरकर..
तुमचे ते आणि आमचे हे
जात-पात ? छे...! छे...!
राजकारणी भिक्कारचोट !
जनता म्हणजे नकली नोट...
तब्बल २६ पर-सेंट व्होटिंग,
"साला नेता करतो चीटिंग !"
आम्ही केले पेट्रोल स्वस्त,
पुर्वीचा 'इंडिया शायनिंग' मस्त,
धुवू कोळशाचे काळे 'हात',
रामराज्य? ते तर 'बौद्धिका'त..!
सुरक्षा व्यवस्थेची जावो रया,
राष्ट्रद्रोह्यांप्रत भूतदया,
सक्षम आहे पोलिस खाते,
''बडे शहरों में छोटी छोटी बाते!"
इकडे बघा, महागायक
१२वे वर्ष प्रसिद्धि-दायक,
इकडे आमचे महागुरू,
"चल बेट्या, हो जा शुरू!"
मायमराठी की तो मज्जाय 'भय्या'!
तिचे सैनिक मांडती ठिय्या,
भाषा-प्रांतवादाचा उच्छेद,
'कॉस्मो-पॉलिटन्' बुद्धिभेद !!
इकडे आमचे खळ-खट्टक्,
झालो फेमस, झाली अटक,
सायबांचा आमच्या जयजयकार,
स्कॉच-व्हिस्की गारेगार !
''अचूक बातमी ठाम मत''
च्यानलवर सायबांच्या पक्षाचे छत,
बाणेदार आणि आक्रमक..
बोलबच्चनांची नवी कुमक!
साहित्य संमेलनातील शोध,
वादे वादे तत्त्वबोध!
महान कवींची 'निवडणूक'(?)
आम्हां साहित्याची भूक !
मराठी सिनेमाची ऑस्करवारी,
प्रत्येक शिणेमात आयटम भारी,
(पण) सिरीयलसारखी मज्जा नाय..
रंगभूमी तर सेक्सी हाय...!
तरुण नाटकांचे नवेच प्रश्न,
दारू-पार्ट्या आणि जश्न,
साला 'अडोलेसन्स'मध्ये सेक्स नाय?
संस्कृती? भेन्चोद ! हाय हाय !
जय जय सद्गुरू ! जय हो बाबा !
इंद्रियदमन, श्वासावर ताबा,
हजारवर्षापूर्वीचं फाष्टेष्ट विमान,
भारतीय संस्कृतीची चढती कमान!
पवित्र वचने, दिव्य श्लोक,
सप्त पाताळे तिन्ही लोक,
प्रत्येक देवाला शंभर बळी,
दिव्य प्रचिती दूधखुळी..
नव्या युगाची नवीन वार्ता,
महासत्ता बनवू भारता,
परदेशांत बसून करू निश्चय
भारतमाते, जय हो... जय!!"
'प्रतिभेची उत्तुंग भरारी' वगैरे... :)
ReplyDeleteता.क. नाट्य-प्रेम ओसंडून वाहते आहे.
'फर्गी'च्या आठवणींचा उमाळा(?)
like...
ReplyDeleteअशक्य!!!!!!
ReplyDeleteअसाध्य ते साध्य...करिता सायास...कारण अभ्यास...तुका म्हणे.... :-)
ReplyDeleteJORDAR
ReplyDeleteप्रचंड रागात लिहीलेली कविता...
ReplyDeletechangli zali aahe kavita. :)
ReplyDeleteअरे लई भारी मित्रा !
ReplyDeletephar awadali!! thoda paramparik 'phatka'chya javal jatoy ka ha usfurta udgaar...?
ReplyDeleteधन्यवाद, साक्षीजी! असं म्हणायला काहीच हरकत नाही! हेतू तसाच काहीसा आहे. :))
Deleteअफलातून...
ReplyDeleteजबरदस्त ...अगदी तंतोतंत ....
ReplyDelete