फेस्बुकाचा फोलपणा

जाणुन घ्या हो फेस्बुकाचा फोलपणा
फिरून-फिरुनी पृथ्वीचा हा गोलपणा|

हौशा-नवशा-गवश्यांसाठी नवलाई,
बोलबच्चनी मतांत शोधा थोरपणा||

आस्तिक-नास्तिक तत्त्वविदांची गर्दी अन्,
अमूल्यशा वेळेचा मातीमोलपणा||

अनर्थाप्रति लोकशाहि नेतात इथे,
अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा घनघोरपणा||

भले प्रगल्भहि लेव्हल सोडुनि बडबडती, 
विसरुनिया जाणीवांचा सखोलपणा ||

इथे शॉट डोक्याला लाउन घेऊ नये,
केवळ चुत्त्येगिरी टवाळखोरपणा ||

उथळ जरी पाणी इथले परि समुद्र हा,
काहि मोजक्या बेटांपाशी खोलपणा||

अफाट प्रतिभा लोकशक्ति जरि दिसत इथे,
आंतरजाली त्याला कवडीमोलपणा||

कळले जरी हे व्यसन पूर्णत: ना सुटते,
उसंत काढून करितो बडबडबोलपणा|| 

बोललो परी ऑनलायनी येइन मी,
शब्दांचा हा केवळ गोलमटोलपणा|| 

परी पायरी फे.बू. सुटण्याची पहिलि,
हाची या कवितेचा अन् अनमोलपणा||

Comments

  1. प्रसाद वैद्यDecember 30, 2012 at 3:22 AM

    फेस्बुकावर पोस्ट कर रे छान आहे ;) :)

    ReplyDelete
  2. पटले हो..फेस्बुकावर एक page सुरु करा आता.. 'facebook haters' अशी.. :p

    ReplyDelete
  3. फेसबुक आणि आपले, नाते हे पती पत्नी सारखे आहे.
    सर्व मनासारखे झाले तरी, काहीतरी कमी जाणवतेच.
    .
    शेवटी काय, आपण आंधळेपणे प्रेम करत नाही हेच खरे.

    ReplyDelete
  4. फ़ेसबूक म्हणजे दुर्लक्षितांना हक्काचे मिळालेले व्यासपीठ,
    अवघड असते त्यांना बाहेर कुठे ओळखणं...

    ReplyDelete
  5. मी जर म.न.से., त हे फ़ेस्बूक ’टोल’पणा...
    उकिरड्यातल्या रद्दीचा अनमोलपणा

    ReplyDelete
  6. फ़ेसबूक हा चंगेझी मंगोलपणा...
    स्थिरस्थावरल्या आयुष्या हिंदोलपणा...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

पूर्वमेघ

जय हो...