Posts

Showing posts from 2013

आरती अँग्लो पाक्-हिंदुस्थानाची

'आसिंधुसिंधू वगैरे हिंदुस्थान' किंवा 'आमची अनादि-अनंत महान संस्कृती'  वगैरे पोकळ गफ्फांना वैतागून, 'अध्यात्म-धर्म' वगैरेच्या बाजाराला विटून, इतिहासादिंविषयीच्या वृथा अभिमानाचे डंके असह्य होऊन, आणि इतिहासाच्या सत्या-सत्यतेच्या राजकारणाला बलपूर्वक चरणस्पर्श करून... देवतांना माणसाळवणाऱ्या वग-नाट्यपरंपरेतील शाहिरांना स्मरून, पुरोगामी न्यूज-चॅनल अँकर्सच्या उच्चभ्रुत्वनिदर्शक आकांडतांडवी 'आगळ्यावागळ्या' वर्तमानाकडे सक्रोध कटाक्ष टाकून, मार्क्सवादी-समाजवाद्यांच्या सुखासीन होत गेलेल्या इतिहासाला दुर्लक्षित करून, आजकाल बहुतांशवेळेस केवळ मौखिकव्यापारासाठीच औचित्यपूर्ण ठरत असलेल्या त्यांच्या  विद्वत्तेला स्मरून व जगातील वास्तवे नाकारत आपल्या विश्वात रमणाऱ्या हस्तीदंती घरांतल्या विचारवंतांना हाड्ड म्हणून... इतरांना भोचकपणे खिजवत सुखाने जगणाऱ्या हॅप्पि गो लकी ड्यूड्स् वगैरेंना विनम्र अभिवादन करून आणि पुरोगामी-प्रतिगामी-धार्मिक-नास्तिक-कम्युनल-नॉनकम्युनल अशा सर्वांच्या अहंकारांना चुचकारून दक्षिण-आशियायी इतिहास-धर्म-भाषा विषयात काम करणाऱ्या, आटपाट नगरीत

इतिहासाचं वर्तमान-भविष्य!!

आज ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ.ब्रह्मानंद देशपांडे गेल्याची दुर्दैवी बातमी आली!! संस्कृताभ्यासक डॉ. प्र.शं. जोशी (डॉ.आंबेडकरांच्या देदीप्यमान आयुष्यावरील 'भीमायन' या महाकाव्याचे कर्ते), डॉ.शि.द. जोशी (विख्यात वैयाकरण) अन् डॉ. कृष्ण श्री. अर्जुनवाडकर (मराठी व्याकरणकार, संस्कृतपंडित व कवी) या थोर प्राच्यविद्यापंडितांच्या एका पाठोपाठ एक जाण्याने झालेलं दुःख अधिकच गडद झालं! तसं साधारण एकाच वयाची, पंच्याऐंशी-नव्वदच्या आसपास वय असणारी ही मंडळी! आपापल्या क्षेत्रात दिग्गज असलेल्या ह्या अभ्यासकांकडून कधीनाकधी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष शिकण्याचा, त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग आला होता. त्यांच्या जाण्याचं दुःख हे अगदी आप्तस्वकीय गमावल्याचंच दुःख! हल्लीच्या काळात अभ्यास क्षेत्रात; त्यातही इतिहास-भाषा क्षेत्रात घुसलेल्या, राजकारण्यांना जातीय व्होटबँक मिळवून देण्यासाठी तत्पर असलेल्या, एकास एक 'सर' अशा स्वयंघोषित, भुरट्या, 'अभि-जात'वादी 'अभ्यासकां'(?)च्या वाढत्या उपसर्गाचे फेसबुकादि माध्यमांतून होणारे उन्मुक्त प्रकाशन आणि छछोर, अॅकॅडमिक शिस्त नसलेली, बुद्धिभेदजनक संशोधन

संघ नको, कॉंग्रेस नको...

संघ नको, कॉंग्रेस नको माझ्या नावे मम पक्ष हवा, पक्षाध्यक्षहि इथली थुंकी तिथे लावण्या दक्ष हवा| मंत्रीगण-सहकारि नको एकट्यास सगळा भोग हवा, प्रचारामध्ये जाहीराती करण्यासाठी योग हवा| असेल गौतम, नको बुद्ध तो, अदानी परी चुस्त हवा, अनिल आणि मुकेशापरी सपोर्टर कसा मस्त हवा!! मीडीया मम दास असावा, प्रसिद्धीचा मज सोस हवा,  वाट्टेल तशा थापा फेकिन, भाषणात परि जोश हवा||  अंध भक्त अन सपोर्टरांचा पाठिंबाहि अलोट हवा, त्यांच्या अंगी माझी नावे विणलेला तो कोट हवा| अदानीकडून अर्थ हवा, हेलीकॉप्टरचा खर्च हवा, हिंदू धर्माच्या नावे मज व्होट बँकचा चर्च हवा| गांधींसम ब्रँडँबेसेडर प्याद्यावरती क्लेम हवा, पटेल-पुतळा लिबर्टिच्या पुतळ्यासम सेम हवा|   ओबामा येवो पुतीन वा जिथे तिथे मज मीच हवा, मला हवे ते तसे खेळण्या ओबडधोबड पीच हवा|  © हेमंत राजोपाध्ये

जागतिक स्तरावरील डेलिबरेट हिडीस भिकारकाव्य

शीर्षक: समांतर-तत्त्व!! छंद: उन्मुक्त धुंद अशा पहाटवेळी साखरझोप मोडणारी ही सु-सु, बाहेर पडायच्या वेळी सुरु होणारा पाऊस किंवा स्नो-च्या फ्लरीज्! केबिन लॉक करताना कॉपीरायटरला येणारं अर्जंट जाहिरातीचं ब्रीफ.. आवडत्या मुलीची आणि आपली जुळून येणारी सगोत्रता..! यांच्यात दिसून येतं एक तत्त्व, समांतरत्व..!! पावसाला जायची घाई असलेली चेरापुंजी आणि पोटाच्या हलक्या स्वप्नांचे एकमात्र लक्ष्य असलेले डेस्टीनेशन अर्थात् संडास! लग्नाळू मुलाला एकामागून एक मुली बघायला लावणारं लग्न आणि साडे-पाच वाजता घाईत धावत पकडायचा, ठरलेला लोकलचा डबा! यांच्यातही दिसून येते तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व..!! अनामिक हुरहुरीने अस्वस्थ होणारं मन आणि विदाउट तिकीटवाल्यांना टीसी दिसल्यावर येणारी अस्वस्थता! गर्दीत ढूसकुली सोडणारे आपणच आहोत हे कुणाला कळेल म्हणून भांबावून जाणारं मन, आपल्या फेसबुक-पोस्टला 'तिचा' लाईक येईपर्यंत नव्या फेसबुकीला येणारं फिलिंग! यातही असतं तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व!! म्हणून आयुष्य हे कायमच समांतर जात असतं..डोक्यावरून जाणाऱ्या एका नवक

फेसबुक-अडिक्ट पिशीमावशी

भारतात गेल्यापासून एकुणात ऑनलाईन कमीच होतो! तिथे बरीच भटकंती झाल्यावर पुन्हा इथे आलो आणि फेस्बुकावर, जी-मेलवर एक्टिव्ह झालो. ब्लॉगावर काहीही न लिहिल्याची जाणीव मनाला खात असतानाच हि बया, पिशी आठवली! साधारण एक वर्षापूर्वी डोस्क्यात आलेली ही पिशीसुद्धा जालावर यायला उतावीळ झाली. आता तिला 'नाही' म्हणणं अवघड आहे.  घ्या, झेला या पिशीला!   कितेक दशकांच्या झोपेतुन, पिशी मावशी जागी झाली, जागी होऊन 'हर्षो'न्मीलित रसिक-हृदातून पिंगा घाली||१|| अफाट प्रतिभेच्या अर'विन्दा'- -तुनी प्रकटली 'कृत्ये'मधुनी, आज पुन्हां संजीवन लाभुन डोकावित ही अधून-मधुनी ||२|| मात्र टिकोनी आहे बर का तिचा तोच तो खट्याळ नखरा! मानगुटीवर बसुन लिहविते हर्ष मनातुन रसिकास खरा||३|| थयथयाट तो तसा होऊ दे पिशे;मनातुन पुन्हा अमुच्या, जागव पुन्हा अल्लड, हुल्लड आठवणी त्या जुन्या कालच्या||४|| आता पिशे तू उडाणटप्पू पुन्हा-पुन्हा ये भेटायाला, फेसबुकावर टगे-सोयरे सज्ज तुला हे खेटायाला ||५||  पिशी मावशी बर का कळले शाप तुला माती खाण

अखिल भारतीय जातीय संमेलन

घेऊ परशु अन् तलवार, घाव करुया वारंवार जातीयता नि विद्वत्ता ही साहित्यास दुधारी धार... नवे जगत् अन् नवे विचार, पोस्टं-मॉडर्न जुने विखार, कालकूट मंथून ऐकुया गृहकलहाचे नवहुंकार.. अभिव्यक्तिची उन्मत्ता, अखिल भारतीय विद्वत्ता, साहित्याच्या बाजारातुन द्वेषाचीच दिसे सत्ता.. जात-पातिचे मेळावे, सरकारी जन खेळावे, गटा-तटांना पोसुन रबरी- चेंडू सम त्यां झेलावे.. नवी जानवी, नवे विधी, छुपे अजेंडे, जुने कधी.. पुरोगामि बुरख्याच्या आतुन, तोड-फोड करण्या संधी... वाद-विवादच व्यवहार्य, मढी उकरणे हे कार्य, संजीवन मंत्राचा द्रष्टा झारितला शुक्राचार्य जात कदापी नाही जात, शस्त्र-शास्त्र-तत्त्वांची साथ, विविधतेत हा एक विचार राष्ट्रहिताची ही रुजवात.. वादे वादे नवीन बोध,  समाजशास्त्रिय नवीन शोध, मिथकांचा हा भव्य पसारा, खोद खोद रे अजून खोद..