जागतिक स्तरावरील डेलिबरेट हिडीस भिकारकाव्य
शीर्षक: समांतर-तत्त्व!!
छंद: उन्मुक्त
धुंद अशा पहाटवेळी साखरझोप मोडणारी ही सु-सु,
बाहेर पडायच्या वेळी सुरु होणारा पाऊस किंवा स्नो-च्या फ्लरीज्!
केबिन लॉक करताना कॉपीरायटरला येणारं अर्जंट जाहिरातीचं ब्रीफ..
आवडत्या मुलीची आणि आपली जुळून येणारी सगोत्रता..!
यांच्यात दिसून येतं एक तत्त्व, समांतरत्व..!!
पावसाला जायची घाई असलेली चेरापुंजी आणि
पोटाच्या हलक्या स्वप्नांचे एकमात्र लक्ष्य असलेले डेस्टीनेशन अर्थात् संडास!
लग्नाळू मुलाला एकामागून एक मुली बघायला लावणारं लग्न
आणि साडे-पाच वाजता घाईत धावत पकडायचा, ठरलेला लोकलचा डबा!
यांच्यातही दिसून येते तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व..!!
अनामिक हुरहुरीने अस्वस्थ होणारं मन आणि
विदाउट तिकीटवाल्यांना टीसी दिसल्यावर येणारी अस्वस्थता!
गर्दीत ढूसकुली सोडणारे आपणच आहोत हे कुणाला कळेल म्हणून भांबावून जाणारं मन,
आपल्या फेसबुक-पोस्टला 'तिचा' लाईक येईपर्यंत नव्या फेसबुकीला येणारं फिलिंग!
यातही असतं तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व!!
म्हणून आयुष्य हे कायमच समांतर जात असतं..डोक्यावरून जाणाऱ्या एका नवकवितेसारखं..!
आणि आपल्याला ते झक मारत जगावं लागतं एकाकीss !
शून्य सेनेचा सेनापती असलेल्या अश्वत्थाम्यासारखं.
इन-मिन् तीन टाळक्यांनी येऊन वाहव्वा केलेल्या नव्या समांतर रंगभूमीच्या genreसारखं
अथवा कुणीही भाव न देणाऱ्या नवकवितेच्या जनकासारखं
कारण अश्वत्थामा असो, समांतर रंगकर्मी असो किंवा तो नवकवितेचा जनक असो..
यां तिघांतही दिसून येतं तेच तत्त्व अर्थात् समांतरत्व!
आपणास साष्टांग नमस्कार महाशय! तुस्सी ग्रेट हो! अश्या भन्नाट, तात्त्विक आणि गहन काव्याला डेलीबरेट हिडीस भिकार काव्य म्हणणे हे महान पातक!
ReplyDeleteहेम्या तुला सुचले आणि मी आणि आपण सर्व वेळो प अपवेळी जगतो
ReplyDeleteअर्थात तेच ते ....सम अंतर अस "लेले" :) तत्व :)
Hemant,Your poem rocks as usual.
ReplyDeleteही आंतर्राष्ट्रीय दर्जाची काव्यप्रसूती केल्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा!
ReplyDeleteमस्त !
ReplyDeleteshevatache kadave mast!
ReplyDelete