अखिल भारतीय जातीय संमेलन
घेऊ परशु अन् तलवार,
घाव करुया वारंवार
जातीयता नि विद्वत्ता ही
साहित्यास दुधारी धार...
नवे जगत् अन् नवे विचार,
पोस्टं-मॉडर्न जुने विखार,
कालकूट मंथून ऐकुया
गृहकलहाचे नवहुंकार..
अभिव्यक्तिची उन्मत्ता,
अखिल भारतीय विद्वत्ता,
साहित्याच्या बाजारातुन
द्वेषाचीच दिसे सत्ता..
जात-पातिचे मेळावे,
सरकारी जन खेळावे,
गटा-तटांना पोसुन रबरी-
चेंडू सम त्यां झेलावे..
नवी जानवी, नवे विधी,
छुपे अजेंडे, जुने कधी..
पुरोगामि बुरख्याच्या आतुन,
तोड-फोड करण्या संधी...
वाद-विवादच व्यवहार्य,
मढी उकरणे हे कार्य,
संजीवन मंत्राचा द्रष्टा
झारितला शुक्राचार्य
जात कदापी नाही जात,
शस्त्र-शास्त्र-तत्त्वांची साथ,
विविधतेत हा एक विचार
राष्ट्रहिताची ही रुजवात..
वादे वादे नवीन बोध,
समाजशास्त्रिय नवीन शोध,
मिथकांचा हा भव्य पसारा,
खोद खोद रे अजून खोद..
परशुरामाने कसलीच साहित्य निर्मिती केली नाही. गेला बाजार एखादे फुटकळ "परशु-सूक्त" पण त्याच्या नावावर नाही. तरी पण त्याचे बुजगावणे साहित्य संमेलनात कशाला?
ReplyDeleteराजीव उपाध्येजी, आपल्या प्रतिक्रियेसाठी धन्यवाद! आपल्या प्रतिक्रियेतील तपशिलाच्या दृष्टीने व मिथकांच्या व परंपरेच्या परिप्रेक्षात पहायचे झाल्यास परशुरामांच्या नावे 'परशुराम कल्पसूत्र' नावाचा श्रीविद्येवरील ग्रंथ आहे. आता त्या ग्रंथाच्या कर्त्तृत्वाच्यासंबंधीचा एकेडमिक अप्प्रोच हा निराळा भाग! बाकी त्यानावाने विशिष्ट समुहाने आयकॉन करून मग्रुरी दाखवण्याचा प्रयत्न करणे व त्यानावाने जातीयता पसरवून साहित्य संमेलनात जातीय राजकारण करणाऱ्या सर्वांचाच निषेध करावा तितका थोडा!
Deleteबहुत जाहले हुल्लडबाज जन
ReplyDeleteapratim zaliye kavita hemant...
ReplyDeleteमस्त काव्य जमून आले आहे ४ बी ग्रेडी नाचले म्हणून वा ४ ब्राम्हण शिकले म्हणून गावो गावी होणारी परशुरामाची पूजा या ४/५ शतकात तरी बंध होणार नाही
ReplyDeleteपरशुरामाने पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रीय केली हे एक रूपक आहे.
ReplyDeleteमुळात जर ती एकदाच नि:क्षत्रीय जरी झाली असती तर पुन्हा करावी लागलीच नसती!
आणि हे सर्व करता करता मग त्याला बोध झाला की अरे क्षत्रियांचा नि:पात करता करता आपण स्वत:च क्षत्रीय झालो! अर्थात, क्षात्रवृत्ती धारण कर्ते झालो!
मुळात या कधेचा बोध असा आहे की क्षत्रीय ही जात किंवा मानवी प्रजात,समूह, नसून मानवी वृत्ती आहे!
आणि तिचा जेंव्हा समाजास, बहुजनांस उपद्रव होऊ लागला तेंव्हा देवाने अर्थात जनता जनार्दनाने त्यास धडा शिकविला..आजही थोडेफ़ार तसेच चित्र आहे...ज्यांच्या हाती सत्ता आहे ते सर्वांस त्रास देत आहेत...असे असताना अनाठायी वाद घालूंन बुद्धिमंतांनी तरी फ़ुटीरतावाद्यांस सहाय्यभूत होऊ नये! रात्र वै-याची आहे!