Posts

आम्ही कोण...?

आज, दिनांक २७ ऑगस्ट २०१२च्या लोकसत्तेत आलेल्या लेखावरून प्रेरित होऊन झालेले केशवसुतांच्या कवितेचे विडम्बन! खूप दिवस हा विषय डोक्यात होताच.. आज ह्या संपादकीयामुळे किल्ली बसली, आणि एकटाकी लिहून काढलं ते इथे पोस्ट करतो !  'प्रस्थापित म्हणवून घ्यावे लागणाऱ्या' समस्त सरकारी सारस्वतांप्रत समर्पित :  आम्ही कोण म्हणोनि काय पुससी ह्या अग्रलेखातुनी ? श्रोत्यांनी जग व्यापिलेच अवघे आम्हांस भटकायला, विश्वी राजकवींपरि विचरतो सर्वत्र हो लीलया        सरकारातुनी कार्यभार मिळवू आम्ही 'महामंडळी'*,        सारा हि बडिजाव येथ मिरवू, उचलू 'टग्यांची' तळी 'पाणि'स्पर्श हि राजकारणि महानेत्याकडुन् मागुया ''मोठाले अनुदान?'', ते हि मिळवू; संमेलनालागि या            फोले पाखडिता क्वचित् दिसतसे नि:स्वार्थी आम्हांमध्ये         सारे काही मिळोनि हो दळिदरी आम्हीच विश्वामध्ये कोट्यातून न लाभले घर असा; वा लाभ कसला उगी;  'एस्.टी.-ट्रेनमधूनी त्या सवलती ना घे असा' ना जगी       ...

फेसबुकावर टगे-सोयरे

जर्मनीत येऊन आणि फेसबुकचा वापर सुरु करून एक वर्ष झालं! हे असं वर्ष-तिथी-तारीख वगैरेंचा हिशेब मांडताना माझं मलाच हसू आलं  ! पण विषय आहे फेसबुकचा...त्यामुळे तिथी , पंचांग , अध्यात्म , क्रांती , पुरोगामी , ब्राह्मणी-अब्राह्मणी ह्या शब्दांचा वापर केल्याशिवाय , या न त्या माध्यमातून स्टेटस अपडेट केल्याशिवाय किंवा वाचल्याशिवाय फेसबुकचा फील आल्यासारखे वाटत नाही. असो..! (सुरुवातीलाच हा ' असो ' आल्यामुळे ह्या शब्दांचा किती उबग आला असेल हे सूज्ञांस कळू शकेल!) तर..सांगायचे असे कि जर्मनीत आल्यापासून अस्मादिकांचा फेसबुकावरील संचार वाढला! तसे पूर्वी मी ऑर्कुट वापरत असे. पण माझ्या एका अल्बमच्या प्रकाशन कार्यक्रमात एका मोठ्या , नामांकित व्यक्तीने ' फेसबुक पर मिलते रहो..! ' असे सांगितल्यामुळे मी ह्या झुकरबर्गाच्या ' लवासा ' मध्ये ((रावणाच्या लंकेत ' या चालीवर वाचावे)प्रवेश करते झालो. तेव्हा हे ' लवासा ' डेव्हलपिंग फेजमध्ये होतं. ऑर्कुट तेजीत होतं. पण मला या सोशल नेटवर्किंग साईट्सरूपी लंकेच्या , सर्वांना अक्सेस करण्यास मुभा असलेल्या सिक्रेट चेंबरमध्ये एवढ्या च...

मधुशाला

Image
उमर खय्याम यांच्या रुबाया वाचून, त्याने भारलेल्या प्रयाग (अलाहाबाद) येथील हरिवंशराय 'बच्चन' नामक  एका तरुणाने  त्या रुबायांच्या धुंदीत हिंदी कवितेला एक अनमोल प्रातिभ-रत्न प्रदान केलं. छायावादी कवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या बच्चनांच्या या मधुशालेच्या शेकडो आवृत्त्या निर्माण होऊन हि मधुशालेच्या मधुरसाचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. मदिरा जुनी होत जाते तशी ती अधिक रुचकर होऊन जाते..तिची मादकता वाढत जाते असं म्हणतात. या मधुशालेचे मराठी, कन्नड, तेलुगुपासून ते अगदी देववाणी संस्कृतमध्येही तिचे अनुवाद झाले आहेत.  वयाच्या १५व्या वर्षी माझ्या हाती ही मधुशालेची अक्षय्य सुरई लागली, ती गंगेच्या काठी, वाराणसी येथे असताना!  आयुष्यातला  '३१ मे'चा तो दिवस..मी  कधीही विसरू शकत नाही! त्या दिवशी जो हा प्याला तोंडाला लावला, तो अजून प्यायचा थांबलोच नाही. रोज 'शुभं करोति..' म्हटल्याप्रमाणे मी त्यातल्या रुबाया नित्यनेमाने म्हणू लागलो. बघताबघता त्या तोंडपाठही झाल्या! त्यात पौगंडावस्थेचे ते वय! फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर वयानेहि आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. ति...

आभाळाएवढा मोठा माणूस: प्रा. राम बापट सर

Image
आज सकाळी सकाळी मन उदास झालं...! कारण माहित नाही...! साखरझोपेच्या वेळेतच मला खूप अस्वस्थ वाटू लागलं..खिडकीतून उन्हं येतायत का म्हणून डोळे किलकिले करून पाहिले. पण पडदे लावलेले होते. एरवी पडदे लावले असले तरी सूर्यप्रकाशामुळे डोळ्यातली झोप उडतेच रोज..पण आजचं कारण काही तरी वेगळंच असावं. त्याच अस्वस्थतेत उठलो. उठल्यावर ती अस्वस्थता अधिक गडद झाली. लगेच आईला फोन केला..पण तिच्याशी बोलूनही बरे वाटेना..! उठून अंघोळ केली..देवासमोर उभा राहिलो. नकळत डोळ्यात पाणी तरळले.. कारण.. माहित नाही! काहीतरी झालंय..किंवा होणार ही अशुभाची जाणीव मनाला थरथरवून गेली. घाई-घाईत तसाच आवरून युनिव्हर्सिटीमध्ये आलो. आल्यावर लॉग-इन केलं..तो माझ्या पुणे विद्यापीठातील मार्गदर्शिका, प्राध्यापक डॉ. कुलकर्णीबाईंचा ई-मेल आला..''काल रात्री प्रा. राम बापट गेले..एक जाणता माणूस गेला..!" मगाशी आलेली अस्वस्थता उसळून बाहेर आली. तिचे कारण कळले..! प्रा  राम बापट म्हणजे सुरेंद्र बारलिंगे, ग.प्र. प्रधान, नरहर कुरुंदकर, य.दि.फडके, दुर्गाबाई, इरावती कर्वे अशा दिग्गजांच्या मांदियाळीतील आमच्या समोर वावरणारा, आमच्याशी सहज ...

पूर्वमेघ

"आषाढस्य प्रथमदिवस:|" अर्थात कालिदास दिन! आजच्या ह्या विशेष दिनी ब्लॉगद्वारे लिखाण करण्याचा प्रयत्न सुरु करत आहे! केवल भाषा-साहित्य-इतिहास-धर्म-संस्कृती-समाजशास्त्र अशा माझ्या नेहमीच्या व आवडीच्या विषयांत न अडकता मनातील विचार, अनुभव, टक्के-टोणपे, तथाकथित सभ्य शिष्टाचारी सोवळ्या मनांना क्वचित आवडणार नाही असे आमची अंगभूत टगेगिरी दाखवणारे लिखाणही ह्या ब्लॉगाद्वारे आपल्यासमोर येईल!  या वेळचा हा भारताबाहेर पहिलाच कालिदास दिन! भारतात असताना कधी फर्ग्युसन महाविद्यालयात तर कधी खोपोलीला घरी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कालिदास दिनासाठीच्या सभेत काही नं काही वाचन होत असे..! कधी जाहीर तर कधी स्वतःपुरते! आज तो नेम न मोडता इथे हां वार्षिक परिपाठ-प्रपंच! श्रीज्ञानेश्वर माऊली म्हणतात तसे  "तेथ अभिप्रावोचि अभिप्रायाते विये| भावाचा फुलौरा होत जाये| मतीवरी||"  ह्यानुसार लिहीत राहेन..चालत राहेन... आपल्या अभिप्रायातून, मार्गदर्शनातून अधिकाधिक ज्ञान, आनंद  गवसेल ही खात्री आणि ...