मधुशाला
उमर खय्याम यांच्या रुबाया वाचून, त्याने भारलेल्या प्रयाग (अलाहाबाद) येथील हरिवंशराय 'बच्चन' नामक एका तरुणाने त्या रुबायांच्या धुंदीत हिंदी कवितेला एक अनमोल प्रातिभ-रत्न प्रदान केलं. छायावादी कवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या बच्चनांच्या या मधुशालेच्या शेकडो आवृत्त्या निर्माण होऊन हि मधुशालेच्या मधुरसाचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. मदिरा जुनी होत जाते तशी ती अधिक रुचकर होऊन जाते..तिची मादकता वाढत जाते असं म्हणतात. या मधुशालेचे मराठी, कन्नड, तेलुगुपासून ते अगदी देववाणी संस्कृतमध्येही तिचे अनुवाद झाले आहेत. वयाच्या १५व्या वर्षी माझ्या हाती ही मधुशालेची अक्षय्य सुरई लागली, ती गंगेच्या काठी, वाराणसी येथे असताना! आयुष्यातला '३१ मे'चा तो दिवस..मी कधीही विसरू शकत नाही! त्या दिवशी जो हा प्याला तोंडाला लावला, तो अजून प्यायचा थांबलोच नाही. रोज 'शुभं करोति..' म्हटल्याप्रमाणे मी त्यातल्या रुबाया नित्यनेमाने म्हणू लागलो. बघताबघता त्या तोंडपाठही झाल्या! त्यात पौगंडावस्थेचे ते वय! फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर वयानेहि आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. ति...