Posts

Showing posts from July, 2012

मधुशाला

Image
उमर खय्याम यांच्या रुबाया वाचून, त्याने भारलेल्या प्रयाग (अलाहाबाद) येथील हरिवंशराय 'बच्चन' नामक एका तरुणाने  त्या रुबायांच्या धुंदीत हिंदी कवितेला एक अनमोल प्रातिभ-रत्न प्रदान केलं. छायावादी कवी म्हणून प्रसिद्ध पावलेल्या बच्चनांच्या या मधुशालेच्या शेकडो आवृत्त्या निर्माण होऊन हि मधुशालेच्या मधुरसाचा गोडवा दिवसेंदिवस वाढतच आहे. मदिरा जुनी होत जाते तशी ती अधिक रुचकर होऊन जाते..तिची मादकता वाढत जाते असं म्हणतात. या मधुशालेचे मराठी, कन्नड, तेलुगुपासून ते अगदी देववाणी संस्कृतमध्येही तिचे अनुवाद झाले आहेत. 

वयाच्या १५व्या वर्षी माझ्या हाती ही मधुशालेची अक्षय्य सुरई लागली, ती गंगेच्या काठी, वाराणसी येथे असताना!  आयुष्यातला '३१ मे'चा तो दिवस..मी कधीही विसरू शकत नाही! त्या दिवशी जो हा प्याला तोंडाला लावला, तो अजून प्यायचा थांबलोच नाही. रोज 'शुभं करोति..' म्हटल्याप्रमाणे मी त्यातल्या रुबाया नित्यनेमाने म्हणू लागलो. बघताबघता त्या तोंडपाठही झाल्या! त्यात पौगंडावस्थेचे ते वय! फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतल्यावर वयानेहि आपले रंग दाखवायला सुरुवात केली होती. तिथल्या कट्…

आभाळाएवढा मोठा माणूस: प्रा. राम बापट सर

Image
आज सकाळी सकाळी मन उदास झालं...! कारण माहित नाही...! साखरझोपेच्या वेळेतच मला खूप अस्वस्थ वाटू लागलं..खिडकीतून उन्हं येतायत का म्हणून डोळे किलकिले करून पाहिले. पण पडदे लावलेले होते. एरवी पडदे लावले असले तरी सूर्यप्रकाशामुळे डोळ्यातली झोप उडतेच रोज..पण आजचं कारण काही तरी वेगळंच असावं. त्याच अस्वस्थतेत उठलो. उठल्यावर ती अस्वस्थता अधिक गडद झाली. लगेच आईला फोन केला..पण तिच्याशी बोलूनही बरे वाटेना..! उठून अंघोळ केली..देवासमोर उभा राहिलो. नकळत डोळ्यात पाणी तरळले.. कारण.. माहित नाही!
काहीतरी झालंय..किंवा होणार ही अशुभाची जाणीव मनाला थरथरवून गेली. घाई-घाईत तसाच आवरून युनिव्हर्सिटीमध्ये आलो. आल्यावर लॉग-इन केलं..तो माझ्या पुणे विद्यापीठातील मार्गदर्शिका, प्राध्यापक डॉ. कुलकर्णीबाईंचा ई-मेल आला..''काल रात्री प्रा. राम बापट गेले..एक जाणता माणूस गेला..!" मगाशी आलेली अस्वस्थता उसळून बाहेर आली. तिचे कारण कळले..! प्रा  राम बापट म्हणजे सुरेंद्र बारलिंगे, ग.प्र. प्रधान, नरहर कुरुंदकर, य.दि.फडके, दुर्गाबाई, इरावती कर्वे अशा दिग्गजांच्या मांदियाळीतील आमच्या समोर वावरणारा, आमच्याशी सहज संवाद सा…