Posts

Showing posts from September, 2012

जय हो...

पुन्हा एकदा नवी बातमी, पुन्हा एकदा आम आदमी पुन्हा एकदा पाळू मौन आणि जाऊ भाव खाऊन... पुन्हा मेणबत्त्यांची यात्रा, पुन्हा 'जंतर-मंतर', जत्रा! आणखी एका पुतळ्याचा भंग, आणि आमचा जातीय रंग...! पुन्हा एकदा छत्रपती हिरो गांधी? ह्यांच्या दृष्टीने ते तर झीरो, सावरकर तर दुर्लक्षित, आमी नाय कोनाला भीत...! फुले-टिळक-आंबेडकर, छत्रपती अन आगरकर..  तुमचे ते आणि आमचे हे जात-पात ? छे...! छे...! राजकारणी भिक्कारचोट ! जनता म्हणजे नकली नोट... तब्बल २६ पर-सेंट व्होटिंग, "साला नेता करतो चीटिंग !" आम्ही केले पेट्रोल स्वस्त, पुर्वीचा 'इंडिया शायनिंग' मस्त, धुवू कोळशाचे काळे 'हात', रामराज्य? ते तर  'बौद्धिका'त..! सुरक्षा व्यवस्थेची जावो रया, राष्ट्रद्रोह्यांप्रत भूतदया, सक्षम आहे पोलिस खाते, ''बडे शहरों में छोटी छोटी बाते!" इकडे बघा, महागायक १२वे वर्ष प्रसिद्धि-दायक, इकडे आमचे महागुरू, "चल बेट्या, हो जा शुरू!"   मायमराठी की तो मज्जाय 'भय्या'! तिचे सैनिक