आरती अँग्लो पाक्-हिंदुस्थानाची
'आसिंधुसिंधू वगैरे हिंदुस्थान' किंवा 'आमची अनादि-अनंत महान संस्कृती' वगैरे पोकळ गफ्फांना वैतागून, 'अध्यात्म-धर्म' वगैरेच्या बाजाराला विटून, इतिहासादिंविषयीच्या वृथा अभिमानाचे डंके असह्य होऊन, आणि इतिहासाच्या सत्या-सत्यतेच्या राजकारणाला बलपूर्वक चरणस्पर्श करून... देवतांना माणसाळवणाऱ्या वग-नाट्यपरंपरेतील शाहिरांना स्मरून, पुरोगामी न्यूज-चॅनल अँकर्सच्या उच्चभ्रुत्वनिदर्शक आकांडतांडवी 'आगळ्यावागळ्या' वर्तमानाकडे सक्रोध कटाक्ष टाकून, मार्क्सवादी-समाजवाद्यांच्या सुखासीन होत गेलेल्या इतिहासाला दुर्लक्षित करून, आजकाल बहुतांशवेळेस केवळ मौखिकव्यापारासाठीच औचित्यपूर्ण ठरत असलेल्या त्यांच्या विद्वत्तेला स्मरून व जगातील वास्तवे नाकारत आपल्या विश्वात रमणाऱ्या हस्तीदंती घरांतल्या विचारवंतांना हाड्ड म्हणून... इतरांना भोचकपणे खिजवत सुखाने जगणाऱ्या हॅप्पि गो लकी ड्यूड्स् वगैरेंना विनम्र अभिवादन करून आणि पुरोगामी-प्रतिगामी-धार्मिक-नास्तिक-कम्युनल-नॉनकम्युनल अशा सर्वांच्या अहंकारांना चुचकारून दक्षिण-आशियायी इतिहास-धर्म-भाषा विषयात काम करणाऱ्या, आटपाट नगरीत ...