Posts

Showing posts from 2014

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)

Image
मांडणीसाठी विशेष आभार: संहिता-अदिती जोशी स्वीय प्रस्तावना कितेक दशकांच्या झोपेतुन, बहुदशकानां गभीर शयना- पिशी मावशी जागी झाली, दुत्थिता हि डाकिनी पिशी सा। जागी होऊन हर्षोन्मीलित मृतयोन्यामप्यमृततत्त्वा- रसिक-हृदातून पिंगा घाली।।१।। दमृतवाण्या पुनर्मिलति सा।। . अफाट प्रतिभेच्या अर'विन्दा'- शोभनार’विन्दा’कार-चितौ -तुनी प्रकटली 'कृत्ये'मधुनी, ‘कृत्या’यामाविर्भूतेयम्। आज पुन्हा संजीवन लाभुन पुन: प्रकटिता मत्त: खलु डोकावित ही अधून-मधुनी ।।२।। सिसृक्षा-संजीविनिकलितेयम्।। . मात्र टिकोनी आहे बर का परन्तु रसिका जानन्तु च यत्- तिचा तोच तो खट्याळ नखरा! अद्याप्येव तथैवात्यक्ता:। प्राकृतातुनी संस्कृत होऊन बाल्यास्पद-लीलास्तस्यास्ता: पुन्हा तोच आनंद दे खरा।।३।। संस्कृतायिता: प्राकृतमत्ता:।। पिशीमावशीच्या पोथ्या पिशी डाकिन्या: पांडूलिप्यध्ययनम् मध्याह्नीच्या नंतर रात्री सायंकाले रात्रावथवा- मावळल्यावर चंद्र कधीही, पीयूषांशौ क्वचिदस्तमिते पिशी मावशी चष्मा घालून उपलोचनधृक्पिशी डाकिनी जुन्यापुराण्या पोथ्या पाही पाण्डूलिप्यध्ययने रमते। . रोज वाचते...

रोमन इतिहासास...

Image
मध्यंतरी इटलीला जाऊन दांते, मेकीयाव्हेली, मायकेल अँजेलो, गॅलिलिओ ह्यांची टोंबस् आणि त्यांची कला-ज्ञानसाधना 'याचि देही..' बघून आलो. वसंत बापटांचं मायकेल अँजेलोपनिषद इथे अष्टसात्त्विक भाव जागृत होऊन अनुभवलं ! केवळ अद्भूत, अलौकिक..!! रोममध्ये भटकताना रोमन साम्राज्याचा, माझ्या आवडत्या ज्युलियस सीझरचा इतिहासही (पुलंच्या) 'हरीतात्यां'च्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिला...! प्रबोधनाच्या देशात जाऊन आल्यावर मर्यादा झिडकारून देण्याचं बळ मिळावं इतकं स्थानमाहात्म्य इथे आजही आहे..!  त्यानिमित्ताने काही स्फुरलं, ते लिहिलंय..: ---------------------------------- हे भग्न खांब कलथले; उलथली मूर्ती, भग्नशा भिंतितून साक्ष जुन्याची पुरती, या साक्षींच्या शाहिरा गवसले काय..? इतिहासासम वर्तमान घडतो हाय...! तो शूर रणांगणि खुर्दा पाडुन गेला, त्या क्रूर शत्रुचा मुर्दा पाडुन गेला, एकछत्र तो स्थिर सत्ता देण्या जाई, मित्रांनीही त्या जिते ठेवले नाही...! हा भव्य असा इतिहास सांगुनी जाई, मम चरित्र लिहिण्या रक्ताची हो शाई, ते वाच-वाचुनी जबरदस्त अन् पगडा; आकंठ माखुनी समा...