फ्रेश, आध्यात्मिक नवकविता


रातीच्या किर्र अंधारात कविता ऐकताना, मला आठवते ते झुरळ...
झुरळाचे पंख आणि त्याची फडफड..
फडफडीतून आठवतो त्या भयाण कवितेतला प्रत्येक शब्द..
झुरळ अंगावरून फिरु लागले की आठवते ती त्या कवीची अंगावर येणारी कविता...

मग मीच स्वतःला सावरतो, एखाद्या भेदरलेल्या रसिकासारखा..
आणि उडवून लावतो त्या झुरळाला..
एखादा भीषण, शब्दबंबाळ कवी समजून..

मग कळते ती कविता ही संसार-मायेतील एक छोटीशी लीला असल्याचे 
आणि समजते की ह्या आनंदाची सुखद जाणीव आणि त्या कवितेचा शेवट ह्यांचे ऐक्य...

हाच असतो ब्रह्मानंद...
हाच असतो ब्रह्मानंद...

-हेमंत राजोपाध्ये :D

Comments

  1. तुला काय त्या कवितास्पर्धेमुळे निकृष्ट कविता करण्याचा रोग लागला का काय? मुलगा आधी बरा होता. :p

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

श्रीमद्वडापावरेसिपी-दशकम्|

फेसबुकावर टगे-सोयरे

आभाळाएवढा मोठा माणूस: प्रा. राम बापट सर