संघ नको, कॉंग्रेस नको...

संघ नको, कॉंग्रेस नको माझ्या नावे मम पक्ष हवा,
पक्षाध्यक्षहि इथली थुंकी तिथे लावण्या दक्ष हवा|

मंत्रीगण-सहकारि नको एकट्यास सगळा भोग हवा,
प्रचारामध्ये जाहीराती करण्यासाठी योग हवा|

असेल गौतम, नको बुद्ध तो, अदानी परी चुस्त हवा,
अनिल आणि मुकेशापरी सपोर्टर कसा मस्त हवा!!

मीडीया मम दास असावा, प्रसिद्धीचा मज सोस हवा, 
वाट्टेल तशा थापा फेकिन, भाषणात परि जोश हवा|| 

अंध भक्त अन सपोर्टरांचा पाठिंबाहि अलोट हवा,
त्यांच्या अंगी माझी नावे विणलेला तो कोट हवा|

अदानीकडून अर्थ हवा, हेलीकॉप्टरचा खर्च हवा,
हिंदू धर्माच्या नावे मज व्होट बँकचा चर्च हवा|

गांधींसम ब्रँडँबेसेडर प्याद्यावरती क्लेम हवा,
पटेल-पुतळा लिबर्टिच्या पुतळ्यासम सेम हवा|  

ओबामा येवो पुतीन वा जिथे तिथे मज मीच हवा,
मला हवे ते तसे खेळण्या ओबडधोबड पीच हवा|

 © हेमंत राजोपाध्ये

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

श्रीमद्वडापावरेसिपी-दशकम्|

फेसबुकावर टगे-सोयरे

आभाळाएवढा मोठा माणूस: प्रा. राम बापट सर