थंडीतली ही जर्मनी...



धवळाळली बर्फाळली ही शुभ्र झाली जर्मनी,
हे गोठले जन-जीव अन् ही स्तब्ध झाली जर्मनी...

'हे बर्फ की हा वर्ख?' या कोड्यात गुंग हि जर्मनी,
पिंजारल्या बर्फात रंगुनि दंग झाली जर्मनी...

धुक-दाटली पांढुरली मेघाळली ही जर्मनी,
हिमवृष्टिने पिठुराळली पेंगाळली ही जर्मनी...

बेधुंद त्या मदिरेसवे प्रणयात रंगे जर्मनी,
या शिरशिऱ्या थंडीत वाऱ्यावर तरंगे जर्मनी...

पांढूरक्या रात्रीतुनी चकचककते ही जर्मनी,
बर्फातुनी अन् मार्ग काढत जाइ पुढती जर्मनी...

छोट्या वीरांच्या खेळण्याने स्निग्ध झाली जर्मनी,
स्नो-मेनच्या त्या आकृत्यांनी भरुनि गेली जर्मनी...

नाताळच्या माहौलने मंत्रून गेली जर्मनी,
त्या उष्ण पेया-व्यंजनांनी तृप्त झाली जर्मनी...

मऊशार दुलईतून साखरझोप घेते जर्मनी,
वाफाळल्या कॉफीसवे उत्साहते ही जर्मनी...





ग्योटिंगेन ख्रिसमस-मार्केट

स्नो-मन
माझ्या घराच्या खिडकीतून.. 

Comments

  1. मी वाचलं...थंडीतली ’ही’ आणि जर्मनी

    ReplyDelete
  2. मस्त....
    जितकी कविता चांगली आहे तितकेच, फोटो खाली लिहिलेले "माझ्या घराच्या खिडकीतून" Caption पण आवडले.
    .
    केवळ शिक्षणासाठी वास्तव्य करत असताना, जर ती जागा 'घर' आणि, त्यातही 'आपल' / 'माझ', वाटत असेल तर, आजूबाजूचा परिसर किती रम्य असेल याची कल्पना कारता येते.
    .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

पूर्वमेघ

जय हो...

पिशी डाकिनी संस्कृतमग्ना (कविश्रेष्ठ विंदा करंदीकरांच्या पिशी मावशीच्या काही कवितांचा संस्कृत भावानुवाद)